MURDER IN JAKIMIRYA




 Here is a real story of a murder which took place in Jakimirya. The two friends fought unnecessarily.  A little discussion went high enough to get one killed. It is an unfortunate incident and has a blot on the lovely nature of Jakimirya. They were friends for last many years and had been working in the Bharati Shipyard Company at Miryabunder , two kms away from Jakimirya. The company had stopped working before few years and the two friends were unemployed for last five years. They were drinkers and the cause of murder may be hidden in the drinks . Police are investigating in the matter. Here is a short description in Marathi language for my Marathi readers.

http://www.tarunbharat.com/?p=426036

प्रतिनिधी / रत्नागिरी
मद्याच्या धुंदीत असलेल्या दोन मित्रांमधील चेष्टा-मस्करीचे पर्यावसान वादात होऊन एका तरूणाला जीव गमावण्याची वेळ आली. वादानंतर एका मित्राने मारलेला बांबूच्या काठीचा फटका वर्मी बसल्याने तरूणाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी घडलेली ही घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मृत व संशयित आरोपी हे दोघेही याच परिसरात राहणारे आहेत.
 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शशिकांत सावंत (38, जाकिमिऱया,वरची वाडी, रत्नागिरी) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर या घटनेस जबाबदार असल्याच्या संशयावरून रमाकांत रघुनाथ सावंत (40, मिऱया) याला ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. तसेच एकाच परिसरात राहत होते. अलावा येथील रस्त्यानजिकच्या कट्टयावर हे मित्र सायंकाळी अनेकदा एकत्र बसत असत. याठिकाणी ते मद्यपानही करत असल्याचे सांगण्यात आले.
चेष्टा-मस्करीतून वाद विकोपाला
 नेहमीप्रमाणे ते दोघेही बुधवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास एकत्र बसले होते. या बैठकीत मद्यपान सुरू असतानाच दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रागाने बेभान झालेल्या  रमाकांतने तेथील बांबू संतोष यांच्या डोक्यावर मारल्याचे सांगितले जात आहे. यात संतोष गंभीररित्या जखमी झाले. जखमी झाल्याने तिथेच निपचित अवस्थेत संतोष पडला होता. जवळच आजीकडे राहणाऱया संतोष यांच्या 16 वर्षाच्या मुलाला याची माहिती मिळाली. तो यावेळी खेळत होता. माहिती मिळाल्याबरोबर तो ताबडतोब अलावा येथे घटनास्थळी गेला. त्याचा मामाही त्याच्या सोबत होता.
उपचारापूर्वीच मृत्यू
गंभीर अवस्थेत असलेल्या संतोष याला त्याचा मुलगा व मेव्हण्याने  शहरातील एका खाजगी रूग्णालयात नेले. तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने संतोष यांना घरी आणण्यात आले. दुसऱया दिवशी त्यांना पुन्हा डॉक्टरांकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सकाळी संतोष यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याचे निदर्शनास येताच खासगी डॉक्टरांना बोलावून तपासणी करण्यात आली. त्यावेळी संतोष यांचा मृत्यू झाल्याचे  कुटुंबियांच्या लक्षात आले.
शहर पोलिसांना दिली खबर
 घडल्याप्रकाराची कुणकूण परिसरातील शेजाऱयांना लागली. त्यानंतर संतोष यांच्या नातेवाईकांनी शहर पोलीस स्थानकात धाव  घेतली. त्यांनी सर्व हकिगत पोलिसांसमोर कथन केली. घटनेची माहिती मिळताच पेलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, डोमणे, पोलीस नाईक भितळे यांच्यासह अनेक पेलीस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. कुटुंबिय, परिचित व ग्रामस्थांकडून सर्व परिस्थिती समजावून घेतली. घटनास्थळाचा कसून तपास केला.
प्राथमिक तपासात खून झाल्याचे उघड
अलावा येथे घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी खातरजमा केली. त्यावेळी तेथील कट्टय़ाच्या बाजूला बांबूची काठी पडलेली दिसून आली. या काठीचा प्रहार संतोष याच्यावर करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी पंचनामा करून हा बांबू जप्त केला आहे. तत्पुर्वी संशयित रमाकांत याला पेलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया संध्याकाळी ऊशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरू होती. 
खून पूर्वनियोजित नसल्याचा अंदाज
  हा खून पूर्वनियोािजत नव्हता, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही दोघे अलाला येथील या कट्टयालगत अनेकदा एकत्र बसायचे. त्यांच्यात चेष्टा मस्करीही चालायची. हे दोघे तेथे मद्यमानही करत असल्याची माहिती पोलिसांपर्यत आल्याने यातून हा खून झाला आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  त्यांच्यात काही पूर्ववैमनस्य होते का, याबाबत पेलीस  कसून तपास करत आहेत.
दोघेही एकाच कंपनीचे कर्मचारी
 संतोष व रमाकांत हे दोघेही भारतीय शिपयार्ड  या कंपनीत एकत्र कामाला होते. नोकरीनिमित्त व परिसरातच राहत असल्याने त्यांची घट्ट मैत्री होती. साधारण 10 वर्षापुर्वीपासून ते कंपनीत एकत्र काम करत होते. 5 वर्षापुर्वीपासून ते बेकार आहेत. यामुळे छोटा मोठा कामधंदा बघून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मात्र, एकाएकी असे काय घडले आणि ही घटना घडली, याविषयी उलटसुलट तर्क करण्यात येत आहेत. पोलीस निरीक्षक विनीत चौधरींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Comments